Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा -पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण   औरंगाबाद, दि.26 :- भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे.  त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जनतेला उद्देशून डॉ.सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम

भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनाखाली देशाने केलेली प्रगती अभिमानास्पद - संचालक देवेंद्र भुजबळ

औरंगाबाद,  दि. 26  :- भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनखाली स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब आहे, घटनेने दिलेल्या मुल्यांमुळे देशाचा विकास होत असुन या प्रगतीच्या वाटेवर देशातील वंचित घटकांबरोबर महिला देखील आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संचालक श्री. भुजबळ बोलत होते. भारतीय घटनेने स्त्री -पुरुष समानतेचा अधिकार आपल्याला दिला. याद्वारे भारतामध्ये आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भरीव कामगिरी करुन आपला ठसा उमटवत आहे. वेगवेगळे घटक आज विकासाच्या वाटेवर जोमाने चालत आहे त्यामुळे 'राष्ट्र चिरायु होवो ' अशा शुभेच्छा श्री.भुजबळ यांनी दिल्या. सहायक संचालक डॉ.र

ॲट्रॉसिटी कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करा –मिलिंद भारंबे

         दिनां क : 25 . 1 .201 8 औरंगाबाद, दि. 25   -   समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांना बळी न पडता ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्यवाही पार पाडावी. तपासी अधिकारी यांना गुन्ह्यांच्या तपासात ॲट्रॉसिटी कार्यशाळेचा अतिशय चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी पोलिस अधिका-यांना मार्गदर्शन केले. महसूल प्रबोधिनी येथे औरंगाबादच्या परीक्षेत्रातील नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत दुस-या सत्रात ते बोलत होते. यावेळी नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह , नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज क्षीरसागर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जालना जिल्हा

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची जनजागृती आवश्यक - नवल किशोर राम

दिनांक 24 जानेवारी 2016 औरंगाबाद ,   दि. 24   - भारतीय संविधानाचे संरक्षण, अंमलबजावणी करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, जमाती   अत्याचार प्रतिबंध   कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुसूचित जाती, जमाती घटकातील सर्वांपर्यंत या कायद्याबाबत जनजागृती होणेही अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. महसूल प्रबोधिनी येथे औरंगाबाद परीक्षेत्रातील नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयेाजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. राम बोलत होते. यावेळी औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज क्षीरसागर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जालना जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ प

सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक - डॉ.आरती सिंह

  दिनांक 23 जानेवारी 2018 औरंगाबाद, दि.23 : आजच्या काळात सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जनजागृतीची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी कमी होण्यास त्यामुळे मदतच होणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज येथे केले. औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे आणि जनजागृती अभियानांतर्गत सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती सिंह बोलत होत्या. पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात,  आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाल्या, पोलिस यंत्रणा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मजबूत झाली आहे. माहिती तंत्रज्ञ

घटना दुरूस्तीवर अधिकारी, पदाधिकारी, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

  औरंगाबाद, दि.22 :  राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित 73 व 74 व्या घटनादुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक, सुशासनावर आधारीत असलेल्या विभागीय परिषदेत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ज्येष्ठ तज्ज्ञांनी विचारमंथन करून उपस्थितांना आजच्या विभागीय परिषदेत मार्गदर्शन केले.  परिषदेचे आयोजन राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका यांच्यावतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले होते.  उद्घाटन सत्रानंतर चार सत्रांत तज्ज्ञांनी लोकशाहीची प्रक्रिया, घटना दुरूस्ती, मतदान, मतदान प्रक्रिया, अंमलबजावणी, स्त्रियांचे हक्क आणि जबाबदारी, घटना दुरूस्तीनंतर महिलांचे सशक्तीकरण आदी विषयांवर विचार मांडले. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध व उद्भवणाऱ्या अडीअडचणी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्वसमावेशक प्रशासन, निवडणूक सुधारणा या विषयावर तीन सत्र पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध या पहिल्या सत्रात कृषी परिषदेचे

घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रनिर्माणात महिलांना समान संधी - विजया रहाटकर

औरंगाबाद,दि. 22- प्राचीन काळापासून पंचायत राज व्यवस्था देशात आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले घटना दुरुस्तीमुळे महिलांना भरभ रुन संधी देण्यात आली  त्यात विशेषत्वाने पुरुषांच्या  बरोबरीचे समान स्थान महिलांना या घटना दुरुस्तीतून मिळाल्याने देशाची विकासाची व्दारे खुली झाल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयेागाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. Add caption मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षापुर्ती निमित्त  ‘प्रगती आणि भावी वाटचाल ’ यावर आयोजित विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती रहाटकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, मनपा आयुक्त डॉ. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मधुकरराजे अर्दड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्य निवडणूक आयोगाचे मृदूल निळे, अवर सचिव रीना फणसेकर, कृषी परिषदेचे सेवानिवृत्त संचालक के.एम. ना

होमिओपॅथीच्या शिक्षण विकासाला प्रथम प्राधान्य - श्रीपाद नाईक

औरंगाबाद :  प्राचीन काळापासून सुरक्षित चिकित्सापद्धती म्हणून होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, संशोधनाला यामध्ये प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांची सेवा व्हावी हा उद्देश असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पडेगाव येथील सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.नाईक बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार अतुल सावे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक म्हणाले, केंद्र सरकारने होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशात 218 महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी या शिक्षणाकडे वळले आहेत. देशात होमिओपॅथी शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा. त्या माध्यमातून चांगले डॉक्टर्स घडावेत. रुग्णांची सेवा उत्तमप्रकारे त्या

मुद्रा बँक चित्ररथाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

            दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८ औरंगाबाद :  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे

लासूर येथील महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत मोफत शस्त्रक्रिया

  खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24  रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे.   जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.                    औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय  शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरविण्यात आले.           जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयो

राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ

दिनांक 12 जानेवारी 2018 जिजाऊ शिवबांच्या आदर्श माता, आदर्श गुरूही. कर्तृत्वान, वात्स्ल्य, ममता, मुत्सद्दीपणा, उत्तम निर्णयशक्ती, आत्मसन्मान, तल्लख बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, विनयशीलता, संघटनकौशल्य, औदार्य, महत्त्वाकांक्षा, त्याग, नि:स्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ संगमच. माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस त्यानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरण करून कोटी कोटी वंदन.            शिवबांच्या जडणघडणीत जिजाऊंचा अनमोल असा वाटा.  जन्मापासूनच शिवबांना राजमाता जिजाऊंचा सहवास अधिक लाभल्याने असाधारण अशी मातृभक्ती त्यांच्यात निर्माण झाली.  हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ आऊसाहेब! रयतेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करण्याचे बाळकडू ज्या मातेने दिले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.    जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथला. देवगिरी, यादव वंशातील लखुजीराजे जाधव, म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या. लखुजीराजेंचे घराणे वैभवशाली, स

विकासकामे कामे वेळेत पूर्ण करा - खासदार चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, दि.10 - केंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. खैरे बोलत होते. यावेळी आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, सिकंदर अली,श्री. कुलकर्णी, सर्व नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीत स्वच्छ भारत मिशन, हेरीटेज सिटी विकास, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अटल अभियान (अमृत), स्वच्छ भारत अभियान (नागरी), दीनदयाल अंत्योदय योजना, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना, रस

प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करा - अप्पर जिल्हाधिकारी

औरंगाबाद, दि.9 - प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आज अप्पर जिल्हाधिकारी श्री. पी. एल. सोरमारे यांनी दिल्या.           अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत श्री. सोरमारे बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. डी. फुंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण्‍ा नकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाचे डी.पी. जऊळकर यांची उपस्थिती होती.           श्री. सोरमारे म्हणाले, जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यांची निवड अधिसूचनान्वये करण्यात यावी. सोसायटीच्या कार्य आणि उद्दिष्टांबाबत जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत पोलिस स्टेशन, परिवहन अधिकारी, तहसीलदार यांना माहिती पाठविण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जनावर वाहतुकीबाबत असलेल्या जिल्ह्यातील परवाना यादी पोलिस विभागांना कळविण्यात यावी, असेही श्री.

कौटुंबिक वाद मिटविण्यात मध्यस्थांची भूमिका बहुमोलाची - जिल्हा न्यायाधीश शिंदे

·           कौटुंबिक न्यायालयात  मध्यस्थ जागृती कार्यक्रम  औरंगाबाद, दि.6 (जिमाका )---- कौटुंबिक वादातून दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध दुरावल्या जातात. परंतु मध्यस्थांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने, तडजोडीने मिटवला जातो. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका उपयुक्त, महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी.एस.शिंदे यांनी आज सांगितले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित मध्यस्थ जागृती कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरूणा फरस्वाणी, न्यायाधीश एस.ए.मोरे यांची उपस्थिती होती. मध्यस्थांची भूमिका, प्रक्रिया, न्यायालयीन भूमिका, मध्यस्थांचे कार्य, यश आणि अपयश याबाबत सविस्तर माहिती श्री. शिंदे यांनी दिली. मध्यस्थ केंद्राच्या माध्यमातून जलदगतीने न्याय निवाडा होण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमती फरस्वाणी यांनी श्री. शिंदे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. छाया गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. पोर्णिमा जोशी यांनी केले. आभार ॲड.पद्मिनी मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालय

शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या विपणनाबरोबर गुणवत्तेचा आग्रह धरावा - हरिभाऊ बागडे

                                                                                                            दिनांक.5.1.2018 औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.                         अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, मसिआचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मुख्य समन्वयक ॲड. वसंत देशमुख, विजय बोराडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, नंदलाल काळे, जगन्नाथ पाटील आदींची उपस्थिती होती. विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, आपला देश दूध उत्पादनात

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जानेवारी, 11 मार्च रोजी

     औरंगाबाद,दि.4-राज्यात सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जानेवारी 2018 व 11 मार्च 2018 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि तालुका स्तरीय यंत्रणेने लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्य करावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी श्री. घोलप यांनी  मोहिम अंमलबजावणी बाबत माहिती दिली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम.गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर, पल्स पोलिओ कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्वला भामरे, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.             जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांसह 2 हजार 204 बुथवर 3 लक्ष 21 हजार 372 संभाव्य लाभार्थ्यांना या मोहिमेचा लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ होण्यासाठी लाभार्थ्य