Skip to main content

Posts

Showing posts with the label उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता - उद्योगमंत्री देसाई

औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.   पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी    कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये   श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे   प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातून  

लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी - सुभाष देसाई

औरंगाबाद,दि. 16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती   हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झो डे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक   उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी   नावलौकिक प्राप्त केला. लघु उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन र