जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं.... मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजि त करण्यात आले आहे. ॲग्रो व्हिजन असे या प्रदर्शनाचे नाव. शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरण्यास उद्युक्त करून शेतीत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची भर पाडणारे हे कृषी प्रदर्शन. याठिकाणी 250 हून अधिक शेतीशी संबंधित दालने आहेत. दालनात शेती, शेतीपूरक उद्योग, बी-बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य करणा-या वित्तीय संस्था, शेती उपयोगी वाहने, मसालेदार, चटपट अशा घरगुती उपयोगी वस्तू, खाद्यान्नाचे 23 हून अधिक बचत गटांचे स्टॉल्स यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पर्यटन, कृषी मंडळे, विविध राज्यातून आलेले कृषीविषयक स्टॉल्स, देशातील कृषीशी संबंधित महत्त्वपूर्ण अशी विविध मंडळे, संस्था यांची दालने येथील शेतक-यांच्या ज्ञानात मोलाची भर घालत आहेत. त्यातच शेतक-यांना त्यांच्या प्रयोगात्मक शेतीसाठी तज्ञांचे मार्गदर्शनही या प्रदर्शन व कार्यशाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये...