Skip to main content

Posts

Showing posts from December 25, 2015

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’ वि दर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे . नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते . पट्टेदार वाघ , हरिण , साळिंदर , नीलगाय , अस्वल , मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात . त्यांचे व वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल . निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच , असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय .        येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभ...