Skip to main content

Posts

Showing posts with the label प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा - अर्थमंत्री मुनगंटीवार

औरंगाबाद,दि. 5 -सुशिक्षित बेरोजगार, कल्पक उमदे तरुण, उद्योजकतेची आवड असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्स आणि घडी पुस्तिकेच्या विमोचनानंतर श्री. मुनगंटीवार बोलत होत. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब  कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार चंद्रकात खैरे, आमदार अतुल सावे , संजय शिरसाट, इम्तियाज जलिल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, माहिती व जनसंपर्क विभागाचे  प्रभारी संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मराठवाड्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  जिल्हयात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्

मुद्रा बँक चित्ररथाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

            दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८ औरंगाबाद :  प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे