➢ राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या तीन दिवसीय वारीला औरंगाबादेत सुरुवात ➢ उर्दू इ साहित्य ॲपचे विमोचन, 50 स्टॉल्समध्ये नवोपक्रम औरंगाबाद दि.10 - प्राचीन काळापासून उर्दू भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या देशालास्वातंत्र्य देताना स्वातंत्र्यसैनिकांनी इनक्लाब जिंदाबादचा नारा दिला. हा नारा देखील उर्दूत होता. आपल्या देशाची प्राचीनकाळापासून उर्दू भाषा आहे. या प्रेमळ व आदरयुक्त असलेल्या उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतअसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी स्कायपद्वारे संवाद साधताना शिक्षकांना सांगितले. विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १० ते १२ मार्च या कालावधीत“राज्यस्तरीय उर्दू शिक्षणाच्या वारीचे" आयोजन केले आहे. या वारीच्या उद्घाटनानंतर श्री. तावडे बोलत होते. या वारीचेउद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोनगावकर, राज्य समन्वयक पिराजी पाटील, शिक्षण विभागाच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, शिक्षण उपसंचालक वैजनाथखांडके, सहाय्यक शिक्षण उपसं...