Skip to main content

Posts

Showing posts with the label मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बजाज पाणी संवर्धन प्रकल्प टप्पा 2 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन औरंगाबाद,दि.04 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ झाला असून कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे केले. लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 262 कोटी रुपयांतून 1 लाख 50 हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲङ देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पर