वेळ सकाळी 7 वा. स्थळ शहागंज परिसरातील महात्मा गांधी यांचा पुतळा. ध्येय शहराची साफसफाई. महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन, पुष्पार्पन, अभिवादन. त्यानंतर हातात झाडू घेऊन स्वत: विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर परिसरातील स्वच्छता, साफसफाई करतात. खरंच राज्यात असं पहिल्यांदाच घडत असेल, की शासनाचे सर्व कार्यालये एकाच दिवशी एकदाच शहरात अनोख्या पद्धतीनं नियोजनबद्ध्रित्या यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवितात. पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करतात. लोकंही या मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतात. स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार म...