औरंगाबाद,दि. 15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पि...