· कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थ जागृती कार्यक्रम
औरंगाबाद, दि.6 (जिमाका)---- कौटुंबिक वादातून दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध दुरावल्या जातात. परंतु मध्यस्थांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने, तडजोडीने मिटवला जातो. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका उपयुक्त, महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी.एस.शिंदे यांनी आज सांगितले.
कौटुंबिक न्यायालयात आयोजित मध्यस्थ जागृती कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरूणा फरस्वाणी, न्यायाधीश एस.ए.मोरे यांची उपस्थिती होती.
मध्यस्थांची भूमिका, प्रक्रिया, न्यायालयीन भूमिका, मध्यस्थांचे कार्य, यश आणि अपयश याबाबत सविस्तर माहिती श्री. शिंदे यांनी दिली. मध्यस्थ केंद्राच्या माध्यमातून जलदगतीने न्याय निवाडा होण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले.
श्रीमती फरस्वाणी यांनी श्री. शिंदे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. छाया गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. पोर्णिमा जोशी यांनी केले. आभार ॲड.पद्मिनी मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयाच्या व्यवस्थापक वंदना कोचर, अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास वकील, पक्षकारांची उपस्थिती होती.
Comments