जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी श्री. घोलप यांनी मोहिम अंमलबजावणी बाबत माहिती दिली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम.गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर, पल्स पोलिओ कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्वला भामरे, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांसह 2 हजार 204 बुथवर 3 लक्ष 21 हजार 372 संभाव्य लाभार्थ्यांना या मोहिमेचा लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ होण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत ठरवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. माहिती शिक्षण आणि संवादावर भर देऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही श्री. शेळके यांनी केले
******
Comments