Skip to main content

Posts

Showing posts with the label Atrosity

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची जनजागृती आवश्यक - नवल किशोर राम

दिनांक 24 जानेवारी 2016 औरंगाबाद ,   दि. 24   - भारतीय संविधानाचे संरक्षण, अंमलबजावणी करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, जमाती   अत्याचार प्रतिबंध   कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुसूचित जाती, जमाती घटकातील सर्वांपर्यंत या कायद्याबाबत जनजागृती होणेही अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. महसूल प्रबोधिनी येथे औरंगाबाद परीक्षेत्रातील नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयेाजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. राम बोलत होते. यावेळी औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज क्षीरसागर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जालना जिल्हा पोल...