उदगीर तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार सुरेश पुरी यांना जाहीर SURESH PURI औरंगाबाद, दिनांक 06: उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सन २०१९-२०२० चे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील जनसंवाद व वृत्तपत्रविभागाचे प्रा. सुरेश पुरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत दहा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जाते. पुरस्काराचे अकरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात उत्कृष्ट वार्ता गटामध्ये प्रथम पुरस्कार दैनिक सकाळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बातमीदार अविनाश काळे यांच्या 'शेतमजूरी करुन शिक्षणासाठी घेतला फोन' या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ प...