Skip to main content

Posts

Showing posts with the label भूमी

जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातूनच जलयुक्त शिवार अभियानाची परिपूर्ती - प्रा. राम शिंदे

औरंगाबाद,दि. 7 - देशात राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देखील या अभियानाची दखल घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र या अभियानाला जलसाक्षरतेची जोड आवश्यक असल्याने शासनाने जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रातूनच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण होणार असल्याचा विश्वास जलसंधाण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथील सभागृहात जलनायक, जलयोद्धा उजळणी प्रशिक्षण व चिंतन शिबिरात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह , आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक तथा मृद व जलसंधारणचे आयुक्त दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, उपायुक्त सूर्यकांत हजारे आदींची उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  आजपर्यंत राज्