औरंगाबाद, दि. 26 :- भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनखाली स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब आहे, घटनेने दिलेल्या मुल्यांमुळे देशाचा विकास होत असुन या प्रगतीच्या वाटेवर देशातील वंचित घटकांबरोबर महिला देखील आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संचालक श्री. भुजबळ बोलत होते. भारतीय घटनेने स्त्री -पुरुष समानतेचा अधिकार आपल्याला दिला. याद्वारे भारतामध्ये आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भरीव कामगिरी करुन आपला ठसा उमटवत आहे. वेगवेगळे घटक आज विकासाच्या वाटेवर जोमाने चालत आहे त्यामुळे 'राष्ट्र चिरायु होवो ' अशा शुभेच्छा श्री.भुजबळ यांनी दिल्या. सहायक संचाल...