औरंगाबाद,दि. 26 - लिंबेजळगाव येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा सोहळ्यास मोठ्याप्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. सोहळ्यासाठी संयोजकांमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून उपलब्ध सोयी-सुविधांवर सनियंत्रण, प्रसंगी शासकीय विभागामार्फत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी एकूण 250 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली होती. सोहळ्यात चोख व व्यवस्थितपणे कामगिरी पार पाडल्याबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक करत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. लिंबेजळगाव येथील इज्तेमा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या अधिनस्थ 235 कर्मचाऱ्यांच्या पथकांची स्थापना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केली होती. वैजापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी मुख्य संनियंत्रण अधिकारी आणि गंगापूर तहसीलदार यांनी सहाय्यक मुख्य संनियंत्रण अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. इज्तेमा सोहळा व्यवस्थित पार पा...