Skip to main content

Posts

Showing posts with the label कालाष्टमी

नाथषष्ठी यात्रा उत्सवाची कालाहंडी फोडून सांगता

संत एकनाथ, भानुदासाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला औरंगाबाद, दि.09  :  पैठण येथे सुरु झालेल्या संत एकनाथ षष्ठी सोहळ्याची आज सूर्यास्ताच्या समयी नाथसमाधी मंदिराच्या गाभाऱ्यात कालाष्टमीची दहीहंडी फोडून सांगता झाली.संत एकनाथ, संत भानुदास यांच्या वैष्णवांनी केलेल्या जयघोषात आज शुक्रवार दि.09 मार्च रोजी सायंकाळी मंदिर परिसर दुमदुमून गेला. नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्याहस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली. तत्पूर्वी रघुनाथबुवा महाराज गोसावी, तळेगावकर, पैठणकर, योगीराज महाराज गोसावी, रावसाहेब गोसावी  यांच्या पालखींचे आगमन झाले. पालखीच्या आगमनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. भाविकांनी पावली खेळून आनंद व्यक्त करत भानुदास, एकनाथ महाराजांचा जयजयकार केला. मंदिर परिसरात काला उत्सवात सहभागी होण्यासाठी आबाल वृद्धांसह, महिला भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. विविध भागातून आलेल्या भाविकांसह यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे,  नगराध्यक्ष सुरज लोळगे, रघुनाथ महाराज, योगीराज महाराज, सरदार महाराज गोसाव...