Skip to main content

Posts

Showing posts with the label जागतिक महिला दिन

अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

  दिनां क : 8 . 3 .201 8 औरंगाबाद, दि. 8 – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शासनाने मुली व महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजना अंमलात आणली आहे. या  योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होत असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला, 11 ते 19 वयोगटातील शाळकरी मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले. उस्मानपुरा येथील भानुदास चव्हाण सभागृहात अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री. भापकर बोलत होते. ही योजना अत्यंत महत्तवाची आहे. बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता ॲपव्दारे सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात येऊन मागणीप्रमाणे सॅनिटरी नॅपकीन माफक दरात महिला बचत गट व्दारपोच करणार आहेत. महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या नाविन्यपूर्ण योजनेबद्दल शासनाचे अभिनंदन करायलाच हवे. महिला सक्षमीकरणासाठी मराठवाडा विभाग सदैव अग्रेसर आहे. 5 लाख युवक युवतींना पुढील काही दिवसात स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी, शेतकरी, बचत गट चळवळीला बळकटी आणण्यासाठी, उत्तम शिक्षण, र