Skip to main content

Posts

Showing posts with the label पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी इज्तेमा सोहळ्याची केली पाहणी

औरंगाबाद,दि. 23 –लिंबे जळगाव येथे दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इज्तेमा सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी करुन येथील भाविकांशी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दि. 22 रोजी संवाद साधला.   यावेळी इज्तेमा आयोजन समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अतुल सावे, एकनाथ जाधव, राजू बागडे, हाजी मोहम्मद, एजाज देशमुख, आयोजन समितीचे डॉ. रियाज शेख, आयेशा खान, अतिक खान यांची उपस्थिती होती. कारी शकील, आमीर साहब, जुबेर मोतीवाला, लिंबेगावचे सरपंच अनिक अमिर पटेल आदींसह बाहेरुन आलेल्या धर्मगुरु, भाविकांशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोयीसुविधांची देखील श्री. लोणीकर यांनी यावेळी पाहणी केली. ******