Skip to main content

मुद्रा बँक चित्ररथाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन

            दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८
औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.कदम यांनी केले.

चित्ररथांवर मुद्रा योजनेचे लाभार्थी, योजनेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे, कर्जाचे स्वरुप, आदींबाबत या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गावागावांमध्ये प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री.चिलवंत यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्...

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्ध...

नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा ध्यास घ्या - दुष्यंत आठवले

दिनां क : 15.5.201 7           वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर ...