दिनांक 23 जानेवारी 2018 औरंगाबाद, दि.23 : आजच्या काळात सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जनजागृतीची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी कमी होण्यास त्यामुळे मदतच होणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज येथे केले. औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे आणि जनजागृती अभियानांतर्गत सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती सिंह बोलत होत्या. पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाल्या, पोलिस यंत्रणा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मजबूत झाली आहे. माहिती...