Skip to main content

Posts

Showing posts with the label Aurangabad

लासूर येथील महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत मोफत शस्त्रक्रिया

  खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24  रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे.   जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.                    औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय  शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरवि...

विकासकामे कामे वेळेत पूर्ण करा - खासदार चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, दि.10 - केंद्र आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. खैरे बोलत होते. यावेळी आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, सिकंदर अली,श्री. कुलकर्णी, सर्व नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बैठकीत स्वच्छ भारत मिशन, हेरीटेज सिटी विकास, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अटल अभियान (अमृत), स्वच्छ भारत अभियान (नागरी), दीनदयाल अंत्योदय योजना, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य ...

कौटुंबिक वाद मिटविण्यात मध्यस्थांची भूमिका बहुमोलाची - जिल्हा न्यायाधीश शिंदे

·           कौटुंबिक न्यायालयात  मध्यस्थ जागृती कार्यक्रम  औरंगाबाद, दि.6 (जिमाका )---- कौटुंबिक वादातून दोन्ही कुटुंबातील नातेसंबंध दुरावल्या जातात. परंतु मध्यस्थांच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सामंजस्याने, तडजोडीने मिटवला जातो. त्यामुळे मध्यस्थांची भूमिका उपयुक्त, महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी.एस.शिंदे यांनी आज सांगितले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित मध्यस्थ जागृती कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरूणा फरस्वाणी, न्यायाधीश एस.ए.मोरे यांची उपस्थिती होती. मध्यस्थांची भूमिका, प्रक्रिया, न्यायालयीन भूमिका, मध्यस्थांचे कार्य, यश आणि अपयश याबाबत सविस्तर माहिती श्री. शिंदे यांनी दिली. मध्यस्थ केंद्राच्या माध्यमातून जलदगतीने न्याय निवाडा होण्यास मदत होत असल्याचेही ते म्हणाले. श्रीमती फरस्वाणी यांनी श्री. शिंदे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. प्रास्ताविक ॲड. छाया गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. पोर्णिमा जोशी यांनी केले. आभार ॲड.पद्मिनी मोदी यांनी मानले. कार्यक...

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जानेवारी, 11 मार्च रोजी

     औरंगाबाद,दि.4-राज्यात सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जानेवारी 2018 व 11 मार्च 2018 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण आणि तालुका स्तरीय यंत्रणेने लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्य करावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी संबंधितांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी श्री. घोलप यांनी  मोहिम अंमलबजावणी बाबत माहिती दिली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम.गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस. भटकर, पल्स पोलिओ कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्वला भामरे, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.             जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांसह 2 हजार 204 बुथवर 3 लक्ष 21 हजार 372 संभाव्य लाभार्...

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. याशिवायही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. युनेस्कोच्य...