दिनांक 12 जानेवारी 2018 जिजाऊ शिवबांच्या आदर्श माता, आदर्श गुरूही. कर्तृत्वान, वात्स्ल्य, ममता, मुत्सद्दीपणा, उत्तम निर्णयशक्ती, आत्मसन्मान, तल्लख बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, विनयशीलता, संघटनकौशल्य, औदार्य, महत्त्वाकांक्षा, त्याग, नि:स्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ संगमच. माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस त्यानिमित्त त्यांच्या महान कार्याला स्मरण करून कोटी कोटी वंदन. शिवबांच्या जडणघडणीत जिजाऊंचा अनमोल असा वाटा. जन्मापासूनच शिवबांना राजमाता जिजाऊंचा सहवास अधिक लाभल्याने असाधारण अशी मातृभक्ती त्यांच्यात निर्माण झाली. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ आऊसाहेब! रयतेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करण्याचे बाळकडू ज्या मातेने दिले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथला. देवगिरी, यादव वंशातील लखुजीराज...