☯️राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा ☯️नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबाद , दिनांक 25 : सर्वसमावेशक , नैतिकदृष्ट्या निवडणूक पार पाडण्यासाठी पारदर्शी , निर्भय वातावरणात मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न भारत निवडणूक आयोग करत असते. तरी मतदारांनी सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवारांची निवड करावी , असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज केले. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिंह होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे , पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद , विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल ,...