औरंगाबाद,दि. 5 -ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्याचे कार्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन ग्राहक हक्कांचे संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव डॉ. भारत कदम यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कदम बोलत होते. यावेळी परिषदेचे राधाकिशन भोसले, देवयानी भारस्वाडकर, राजेश मेहता, नानक वेदी , डॉ. जमादार, मीरा काथार, एस.सी. वसावे, एम.बी.काळे, रावसाहेब नाडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत ग्राहकाकरिता वस्तूंची उपलब्धता, गुणवत्ता, वस्तूचे दर, ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा आदी समस्यांबाबत विचार विनिमय झाला. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन समाजातील विविध यंत्रणांकडून जिल्हा प्रशासनाला उपाययोजना सूचविण्यासाठी, शिफारस करण्यासाठी परिषदेतील सदस्यांनी कार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. कदम म्हणाले. त्याचबरोबर ग्राहकांचे हित जपण्यासाठी, ग्राहक संरक्षण (सुधारणा ) अधिनियमानुसार कार्यवा...