Skip to main content

Posts

Showing posts from January 18, 2018

होमिओपॅथीच्या शिक्षण विकासाला प्रथम प्राधान्य - श्रीपाद नाईक

औरंगाबाद :  प्राचीन काळापासून सुरक्षित चिकित्सापद्धती म्हणून होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, संशोधनाला यामध्ये प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांची सेवा व्हावी हा उद्देश असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पडेगाव येथील सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.नाईक बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार अतुल सावे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक म्हणाले, केंद्र सरकारने होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशात 218 महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी या शिक्षणाकडे वळले आहेत. देशात होमिओपॅथी शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा. त्या माध्यमातून चांगले डॉक्टर्स घडावेत. रुग्णांची सेवा उत्तमप्रकारे ...