सार्वजनिक बांधकाम , जलसंपदा विभागाचा घेतला आढावा औरंगाबाद , दिनांक 17 : पैठण , औरंगाबादचे रस्ते खड्डेमुक्त असावेत. त्याशिवाय अपूर्ण विकासकामे , रस्ते , पूल , आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत , दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांना आज दिल्या. सुभेदारी विश्रामगृहाच्या बैठक सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री.भूमरे बोलत होते.जिल्हा परिषद सदस्य विलास भूमरे , मुख्य अभियंता खंडेराव पाटील , अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे , कार्यकारी अभियंता एस.एस. भगत , सहायक अभियंता राजेंद्र बोरकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता , कंत्राटदार आदींची उपस्थिती होती. श्री. भूमरे म्हणाले , कंत्राटदारांनी दर्जेदार कामे करावीत. नागरिकांची गैरसोय होणार नाही , याची दक्षता घ्यावी. पैठण तालुक्यातील अपूर्ण विकासकामे नाथ षष्टीपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. वेळेत पूर्ण कामे न करणाऱ्या कंत्राट...