Skip to main content

Posts

Showing posts with the label कुटुंब कल्याण

लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा -पालकमंत्री डॉ.दीपक सावंत

भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण   औरंगाबाद, दि.26 :- भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे.  त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले. पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जनतेला उद्देशून डॉ.सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल ...