औरंगाबाद,दि. 16 – उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले. सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमा...