औरंगाबाद, दिनांक १० – निसर्गाला पूरक असे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारक पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आज श्री. ठाकरे यांनी केली. यावेळी उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महापौर नंदकुमार घोडेले, मुख्य सचिव अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारक परिसरात असलेल्या वृक्षांमध्ये वाढ करून निरनिराळ्या पक्ष्यांच्या अधिवासास पूरक वृक्षांची लागवड या ठिकाणी करावी. तसेच पर्यावरणपूरक रचनेवर आधारीत स्मारका च्या उभारणीवर भर द्यावा, असेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. श्री. ठाकरे यांना मनपा आयुक्त श्री.पांडेय, वास्त...