Skip to main content

Posts

Showing posts with the label Money

आरोग्‍यं धन संपदा ...

आरोग्‍य हीच आपली संपत्‍ती आरोग्‍याची काळजी प्रत्‍येकाने घ्‍यावी ती घेणे गरजेचेच आहे. म्‍हणून तर सर सलाम तर पगडी पचास... असं म्‍हटल जातं. आपल्‍या आरोग्‍यात बिघाड झाला तर आरोग्‍य यंत्रणा आहेतच. जिल्‍ह्यातील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि तेथे रुग्‍णांना मिळत असलेल्‍या लोकोपयोगी अशा योजना  व कार्यक्रमांची माहिती घेणारा हा आढावा.... https://commons.wikimedia.org                आरोग्यं धन संपदा असं म्‍हटलं जातं. मानवाच्‍या  उत्‍पत्‍तीपासूनच मानव आरोग्‍याची त्‍याला जमेल तशी काळजी घेतो. पूर्वी आयुर्वेदाचा आधाराने आजारावर उपचार होत. वैद्य जडीबुटी देऊन आजारी व्‍यक्‍तीला नीट  करत. काळ बदलला आज 21 व्‍या शतकात मानव वाटचाल करीत आहे. युगानुरुप आरोग्‍य सुविधेत आमुलाग्र बदल झाले. विज्ञानाने प्रगती साधली . असाध्‍य आजारावर साध्य असे उपचार होऊ लागलेत. वर्धा जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेने रुग्‍णसेवा हीच ईश्‍वर सेवा मानून येथील जनतेची निःस्‍वार्थपणे , योग्‍य व यथोचितरीत्‍या सेवा केली, करत आहेत ते येथील कर्तव्‍य तत्‍...