Skip to main content

Posts

Showing posts from June 1, 2021

सीबीएससी बारावी परीक्षा रद्द

मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद मुंबई दि 1: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून 12 वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दहावी व बारावी सारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते.  राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच  घेतला आहे.

कोरोना उपचारात दिलासा !

कोविड १९ :   खासगी रुग्णालयांनाअवास्तव दर लावता येणार नाहीत रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. १ :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी  आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली.  यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खास गी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाट...

जिल्ह्यात 136463 कोरोनामुक्त, 3212 रुग्णांवर उपचार सुरू

                                                                                                                                                                                                                              01062021 औरंगाबाद, दिनांक 01   :   औरंगाबाद जिल्ह्यात आज 408 जणांना (मनपा 136, ग्रामीण 272) सुटी ...