Skip to main content

Posts

Showing posts with the label मेकोरॉट

मेकोरॉटला पाण्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणार - डॉ. पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद, दि. 20 –मेकोरॉट या इस्राईलच्या शासकीय कंपनीला आवश्यक असणारी पाण्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज इस्राईलच्या सदस्यांना दिली. विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत इस्राईलच्या डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राईलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांनी इस्राईल मधील पाण्याच्या मुल्यमापनाबाबत सविस्तररित्या सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. परिस्थिती बदल...