औरंगाबाद,दि.23 –एड्समुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. रुग्णालयातील एड्स तपासणी कीटसाठी आवश्यक उपकरणाकरीता,माहिती, शिक्षण आणि संवादाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत श्री. राम बोलत होते. जिल्ह्यातील आयसीटीसी, डापकु व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एड्स तपासणी कीट ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा. माहिती, शिक्षण आणि संवादावरही भर देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी देखील प्रस्ताव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. सुरुवातीला जिल्हा शल्...