विघ्न दूर करण्यासाठी आले गणराय ... कोकणातला गणेशोत्सव अतिशय उत्साहाचा. गोव्यातही मोठ्याप्रमाणात तो साजरा होतोच. माटोळीने विशेष आकर्षण त्या गणरायाचं दिसतं. बाप्पा विघ्नहर्त्या, आमचे विघ्न दूर कर, असे म्हणत सर्वच जण महाराष्ट्रासह देश- विदेशातील गणेश भक्त आज गणरायाची स्थापना करतात. विदर्भातही मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळं उत्सूक आहेत. काहीं नी आतापर्यंत गणेशाची स्थापना केलीय, तर आता रात्रीपर्यंत काही जण करतील, एकूणच या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा. विदर्भातील अष्टविनाायकांपैकी एक असलेल्या केळझरचा वरद विनायक वर्ध्यातीलच, हे विशेष. वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यात टेकडीवर वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेली ही वरद विनायकाची मूर्ती आहे. अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य अशा परिसराने मनाला शांती मिळते. जागृत गणेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. वरद विनायक, सिद्धीविनायक या नावाने या गणेशाला संबोधले जाते. केळझरला पांडवांनी वास्तव्य केल्याचेही पोथी वाड्मयात सांगितले आहे. भीमाने बकासुरास येथेच ठार केल्याचे बोलले जाते. श्रीरामचंद्राचे गुरू वसि...