‘ स्वाईन फ्लू ’ ने विदर्भासह राज्यात आढळून येतो आहे. 2009 पासून हा आजार सर्वत्र चर्चेला आला. आता तर नागपूर, अमरावती, वर्धा जिल्हयातही या आजाराने डोके वर काढावयास सुरुवात केलीय. परंतु या आजाराबाबत योग्य काळजी घेतल्यास या स्वाइन फ्लू पासून आपण इतर दूर राहू शकतो, हेही तितकेच खरे आहे. मग या आजाराबाबतही आपणास माहिती पण हवीच ना, हा आजार एच 1 एन 1 या विषाणू मुळे होतो. ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटया आदी लक्षणे या आजारात आढळतात. मात्र, याबाबत आपण घाबरून न जाता योग्य काळजी घेतली तरच निश्चितच या आजारावर आपण नियंत्रण ठेवता येते. आजार अतिजोखमीचा पाच वर्षांखालील विशेषत: एक वर्षखालील बालके, 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर -हद्यरोगी, मधुमेहांचे रुग्ण, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असणा-या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणा-या व्यक्ती, प्रतीकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, दीर्घकाळ स्टीरॉईड औषधी घेणा-या यक्तींकरीता हा आजार अतिजोखमीचा ठरुन ...