स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन औरंगाबाद,दि.27—राज्यातील महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी पैठणचा नाथषष्ठी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सर्व भाविकांना योग्य, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी आज पैठण येथे अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही श्री. सोरमारे यांनी केले. पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी सोहळ्याच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री. सोरमारे बोलत होते. बैठकीस पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पैठण नगर परिषद मुख्य अधिकारी सो मनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक...