दिनांक.5.1.2018 औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदा...