Skip to main content

Posts

Showing posts from June 2, 2021

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दिनांक 2 ( Link ) :  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. बैठकीत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1995 अन्वये घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. मार्च महिन्यात शहर हद्दीत चार तर ग्रामीण भागात 13 प्रकरणे घडली. यात दोन बलात्कार, पाच विनयभंग, एक जातीवाचक शिविगाळ इतर पाच प्रकरणांचा समावेश आहे. तर एप्रिल महिन्यातील सात प्रकरणांमध्ये एक बलात्कार, दोन विनयभंग आणि चार इतर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी दिली. या गुन्ह्यांमध्ये वाढ होणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीस पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोंखे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. ******  

गोगाबाबा टेकडी बनवणार ऑक्सिजन हब, झकास पठार ! - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

v    10 हेक्टरवर 6250 लावणार रोपे v    जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य   औरंगाबाद, दिनांक 2  : शहरातील भावसिंगपुरा परिसरातील गोगाबाबा टेकडीवर जागतिक पर्यावरण दिनी (05 जून) सुमारे 6 हजार 250 देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. यामुळे हा भाग ऑक्सिजन हब बनेल. त्याचबरोबर साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवरच विविध फुलांच्या रोपांची लागवड टेकडी परिसरात करून हा भाग झकास पठार करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाचा असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सांगितले. तसेच नागरिकांनी 5 जून रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या सर्व नियमावलींचे पालन करत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून गोगा बाबा टेकडी परिसर अजून हिरवागार करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या पुढाकरातून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून वनरोपन संवर्धन दर्जा कमी असलेल्या वनांत पुर्नरोपन करण्याच्या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे दहा हे