
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत श्री. सोरमारे बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. डी. फुंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण्ा नकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एस कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाचे डी.पी. जऊळकर यांची उपस्थिती होती.
श्री. सोरमारे म्हणाले, जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यांची निवड अधिसूचनान्वये करण्यात यावी. सोसायटीच्या कार्य आणि उद्दिष्टांबाबत जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत पोलिस स्टेशन, परिवहन अधिकारी, तहसीलदार यांना माहिती पाठविण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जनावर वाहतुकीबाबत असलेल्या जिल्ह्यातील परवाना यादी पोलिस विभागांना कळविण्यात यावी, असेही श्री. सोरमारे यांनी सांगितले. प्राणी क्लेष प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारित) अधिनियमाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरूवातीला श्री. राजपूत यांनी सोसायटीच्या कार्याबाबत माहिती दिली.
****
Comments