औरंगाबाद, दि. 26 :- भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला
स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनखाली
स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब आहे, घटनेने दिलेल्या मुल्यांमुळे
देशाचा विकास होत असुन या प्रगतीच्या वाटेवर देशातील वंचित घटकांबरोबर महिला देखील
आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे माहिती संचालक
देवेंद्र भुजबळ यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय
आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा
कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संचालक श्री. भुजबळ बोलत होते.
भारतीय घटनेने स्त्री -पुरुष समानतेचा अधिकार
आपल्याला दिला. याद्वारे भारतामध्ये आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने
भरीव कामगिरी करुन आपला ठसा उमटवत आहे. वेगवेगळे घटक आज विकासाच्या वाटेवर जोमाने चालत
आहे त्यामुळे 'राष्ट्र चिरायु होवो ' अशा शुभेच्छा श्री.भुजबळ यांनी दिल्या.
सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकुर म्हणाले
की, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी नविन संकल्प करुन पुढील वाटचाल करु, असे सांगुन
त्यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माहिती सहायक शाम टरके
म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण परस्परांमध्ये आदरभाव राखुन जोमाने
कामाला सुरूवात करुया असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत,
माहिती सहाय्यक संजिवनी जाधव-पाटील यांच्यासह विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती
कार्यालय आणि माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
Comments