औरंगाबाद,दि.21-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय चित्ररथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून श्री. राम यांनी उद्घाटन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, आर्थिक, सामाजिक विकासाच्या योजनेची उद्दिष्टे आदींबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे ...