Skip to main content

Posts

Showing posts with the label 16 जखमी

करमाड अपघातातील जखमींची विधानसभा अध्यक्षांनी घेतली भेट

औरंगाबाद दि.20 - करमाड येथे कंटनेरमुळे झालेल्या वाहनांच्या अपघातातील सर्व जखमींची रुग्णालयात जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दि.19 रोजी  भेट घेतली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला. डॉक्टरांनी रुग्णांवर करत असलेल्या उपचारांची विचारपूस केली.           करमाड येथे  दि.19 रोजी  आठवडी बाजार होता. औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने ट्रॅक्टर, पीकअपसह दुचाकीस्वारांना उडवले. या अपघातात एकूण 16 जण जखमी झाले. जखमींना तत्काळ औरंगाबाद शहरातील धूत, एमआयटी, घाटी, श्रध्दा इस्पितळात हलविण्यात आले. या रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार सुरू आहेत असे करमाड पोलिस स्थानकाचे निरीक्षक श्री. कोळी यांनी सांगितले.           घाटी रुग्णालयात सचिन खरात (वय 35), काकासाहेब जाधव, नामदेव रंगभरे यांच्यावर उपचार सुरू आहेत असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, डॉ. बी.आर. सोनवणे यांनी विधासनभा अध्यक्ष श्री. बागडे यांन...