खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24 रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे. औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरवि...