Ø राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा औरंगाबादेत शुभारंभ Ø देशातील पहिली योजना, भविष्यात 1 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ औरंगाबाद,दि. 17 – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहा मुख्य घटकांसह सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज औरंगाबादेतून होत असल्याने आनंद वाटतो, असे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतकरी, मेंढपाळ, मजुर आदींच्या पाल्यांनी नियमित अभ्यास करावा. कष्टाने महत्त्वाच्या सर्वोच्च पदांवर पोहचवून समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले. पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत आयोजित राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ व शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनविणाऱ्या फिड मिलच्या उद्घाटनप्रसंगी श्री जानकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आयुक्त कांतीलाल ...