Skip to main content

Posts

Showing posts from February 23, 2018

एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - जिल्हाधिकारी

                औरंगाबाद,दि.23  –एड्समुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. रुग्णालयातील एड्स तपासणी कीटसाठी आवश्यक उपकरणाकरीता,माहिती, शिक्षण आणि संवादाकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत श्री. राम बोलत होते. जिल्ह्यातील आयसीटीसी, डापकु व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एड्स तपासणी कीट ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा. माहिती, शिक्षण आणि संवादावरही भर देऊन मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात एड्सबाबत जनजागृती व्हावी, यासाठी देखील प्रस्ताव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम   यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.             सुरुवातीला जिल्हा शल्...

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी इज्तेमा सोहळ्याची केली पाहणी

औरंगाबाद,दि. 23 –लिंबे जळगाव येथे दि. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या इज्तेमा सोहळ्याच्या ठिकाणाची पाहणी करुन येथील भाविकांशी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दि. 22 रोजी संवाद साधला.   यावेळी इज्तेमा आयोजन समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार अतुल सावे, एकनाथ जाधव, राजू बागडे, हाजी मोहम्मद, एजाज देशमुख, आयोजन समितीचे डॉ. रियाज शेख, आयेशा खान, अतिक खान यांची उपस्थिती होती. कारी शकील, आमीर साहब, जुबेर मोतीवाला, लिंबेगावचे सरपंच अनिक अमिर पटेल आदींसह बाहेरुन आलेल्या धर्मगुरु, भाविकांशी श्री. लोणीकर यांनी संवाद साधला. तसेच सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोयीसुविधांची देखील श्री. लोणीकर यांनी यावेळी पाहणी केली. ******

मुदत द्या, नक्कीच कायमस्वरूपी प्रश्न सोडवू -डॉ. दीपक सावंत

नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी खासदार चंद्रकांत खै...