Skip to main content

Posts

Showing posts with the label घटना दुरुस्ती

घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रनिर्माणात महिलांना समान संधी - विजया रहाटकर

औरंगाबाद,दि. 22- प्राचीन काळापासून पंचायत राज व्यवस्था देशात आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले घटना दुरुस्तीमुळे महिलांना भरभ रुन संधी देण्यात आली  त्यात विशेषत्वाने पुरुषांच्या  बरोबरीचे समान स्थान महिलांना या घटना दुरुस्तीतून मिळाल्याने देशाची विकासाची व्दारे खुली झाल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयेागाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. Add caption मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षापुर्ती निमित्त  ‘प्रगती आणि भावी वाटचाल ’ यावर आयोजित विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती रहाटकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, मनपा आयुक्त डॉ. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मधुकरराजे अर्दड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्य निवडणूक आयोगाचे मृदूल निळे, अवर सचिव रीना फणसेकर, कृषी परिषदेचे सेवानिवृत्त सं...