औरंगाबाद,दि. 5 -सुशिक्षित बेरोजगार, कल्पक उमदे तरुण, उद्योजकतेची आवड असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या फ्लेक्स आणि घडी पुस्तिकेच्या विमोचनानंतर श्री. मुनगंटीवार बोलत होत. यावेळी पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील- निलंगेकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार चंद्रकात खैरे, आमदार अतुल सावे , संजय शिरसाट, इम्तियाज जलिल, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मराठवाड्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हयात प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्र...