दिनांक सोमवार, १५ जानेवारी, २०१८ औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी औरंगाबाद जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या मुद्रा बँक चित्ररथाचे उद्घाटन आज पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्ररथाचे फित कापून पालकमंत्री कदम यांनी उद्घाटन केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभाबाबत ध्वनीफीत, पथनाट्य आणि माहिती पत्रकांद्वारे जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये दोन चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंसह पात्र लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. या चित्ररथामुळे प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना गावागावापर्यंत पोहचविण्यास मदतच होईल. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये योजनांबाबत जागृती निर्माण होईल. हा उपक्रम स्तुत्य असून लाभार्थ्...