औरंगाबाद, दि.22 : राज्य निवडणूक आयोगाच्या संकल्पनेवर आधारित 73 व 74 व्या घटनादुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक, सुशासनावर आधारीत असलेल्या विभागीय परिषदेत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ज्येष्ठ तज्ज्ञांनी विचारमंथन करून उपस्थितांना आजच्या विभागीय परिषदेत मार्गदर्शन केले. परिषदेचे आयोजन राज्य निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली विभागीय आयुक्त कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका यांच्यावतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले होते. उद्घाटन सत्रानंतर चार सत्रांत तज्ज्ञांनी लोकशाहीची प्रक्रिया, घटना दुरूस्ती, मतदान, मतदान प्रक्रिया, अंमलबजावणी, स्त्रियांचे हक्क आणि जबाबदारी, घटना दुरूस्तीनंतर महिलांचे सशक्तीकरण आदी विषयांवर विचार मांडले. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध व उद्भवणाऱ्या अडीअडचणी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्वसमावेशक प्रशासन, निवडणूक सुधारणा या विषयावर तीन सत्र पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे संबंध या पहिल्या स...